Saturday, May 31, 2008

माझ्या कविता

हळुच तु आठवतेस.....

अलगद फ़िरताना चांदण्या रात्रीत,
न्हातान्ना मनसोक्त त्या चांदण्यात,
ह्ळुच तु आठवतेस्....

लपतान्ना त्या आंब्याच्या मोहरात,
डुंबतांना कोकिळेच्या त्या मधुर् मंजुळ स्वरात,
ह्ळुच तु आठवतेस्....

भिजताना त्या ओथंबणारया वर्षावात,
पाघळता ते कोमल थेंब हळुवार् या गालावरुन
हळुच तु आठवतेस...

कुडकुडताना त्या बोचरया थंडीत,
अनुभवताना गारव्याचा तो गुलाबी सहवास,
हळुच तु आठवतेस.....

न्याहाळताना सागराची ती विशाल सौंदर्य,
लुटतना मजा त्या स्तब्ध लहरींशी खेळण्याची,
हळुच तु आठवतेस....

विसावताना अशाच एका शांत क्षणी,
जगण्याच्या स्वार्थी हेतुने श्वास ओढताना,
हळुच तु आठवतेस....
हळुच तु आठवतेस....

शोध
स्वप्नांच्या थव्यामध्ये कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो,
चांद्ण्या रात्रीत कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो,
शोधात असतो मी कुठल्या तरी आभासाच्या,
आभासात कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो.......


नकळतच प्रवेश करतो मी त्या आभासाच्या जगात,
त्या जगात कसल्यातरी शोधात भरकटत असतो,
आकर्षिला जातो कोण्या आभासी म्रूगजळामागे,
त्या म्रूगजळात कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो......


म्रूगजळात असताना लागते कुठेतरी एक जोरदार ठोकर्.....
येतो मी वास्तवात् बळेच्
त्या वास्तवात पुन्हा एकदा मी
कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो.......
कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो.......