Wednesday, July 29, 2015

एक रम्यशी संध्याकाळ तुझ्यासोबत साठ्वावीशी वाटते

First of Rains 2015
एक रम्यशी संध्याकाळ तुझ्यासोबत साठ्वावीशी वाटते

हि मोहक दवथेंबे, ह्या हिरवळीवरच्या सुंदर टिकल्या
धुसरशी ती पहाट आणि हि मोकळी पाउलवाट
मला हि सकाळ तुझ्यासोबत फुलावावीशी वाटते
एक रम्यशी संध्याकाळ तुझ्यासोबत साठ्वावीशी वाटते

हा ढगाळलेला आसमंत, ह्या आगंतुक सरी
ह्या ओशाळलेल्या सावल्या आणि मातीचा सुवास
मला हा पाउस तुझ्यासोबत भिजवावासा वाटतो
एक रम्यशी संध्याकाळ तुझ्यासोबत साठ्वावीशी वाटते

ह्या उंचच उंच लाटा, किनाऱ्यावर त्यांचे आदळणे
त्यांची ती भेटीची लगबग आणि ती क्षणिक भेट
मला हा क्षण तुझ्यासोबत साठवावासा वाटतो
एक रम्यशी संध्याकाळ तुझ्यासोबत साठ्वावीशी वाटते

मंद गार वारा , पहुडलेली तीच वाट
किरणांची ती धुंद छटा, आणि हा एकांत
हि संध्याकाळ तुझ्यासोबत रंगवावीशी वाटते
एक रम्यशी संध्याकाळ तुझ्यासोबत साठ्वावीशी वाटते

हीच ती किनार, हिच ती वेळ
अचानकचाच हा रणरणता पाउस आणि बाजूचा कल्लोळ
तुझ्या येण्याची चाहूल आणि तुझे नसणे
हि जाणीव मला हरवावीशी वाटते
एक रम्यशी संध्याकाळ तुझ्यासोबत साठ्वावीशी वाटते

माझ्या आठवणीतली तू, तुझ्या आठवणीतला हा पाउस
ह्या थेंबांचे ओघळणे आणि त्या थेंबांचे बरसणे
हि चिंब भिजलेली नेहमीचीच वेळ आणि माझा विरंगुळा
मला हे सगळे आठवून रमावेसे वाटते
एक रम्यशी संध्याकाळ तुझ्यासोबतनिवांत जगावीशी वाटते

 /-निखिल 

Wednesday, July 2, 2014

पाऊस आणि मी


पहिला पावसाचा तो टपोरा थेंब..तो अलगद स्पर्श..
त्या थेंबातून डोकावलेला तो धनु आणि माझ्या सोबतची तू ..
खूप छान वाटत...

थेंबांचा तो आसुसलेला आवाज..त्यतली ती आतुरता..
त्या आवाजाला साजेशी ती किलबिल आणि माझ्या गाण्यातली तू..
खूप छान वाटत...

सरींचा तो ओलावा...त्याचा तो तांबूस रंग..
त्या रंगाकडे खेचणारा तो सुगंध आणि माझ्या जाणिवेतली तू..
खूप छान वाटत...

सरींचे थेंब आणि थेंबाचे तळे ...त्याची ती स्तब्धता..
त्या स्तब्ध्तेतली ती उत्कटता आणि माझ्या आठवणीतली तू..
खूप छान वाटत..

पाणावलेल्या वाटा..वाटांची ती वळणे..
त्या वळणांवरच्या त्या पाऊलखुणा आणि माझ्या डोळ्यातली तू..
खूप छान वाटत...

हा पहिला वर्षाव...त्या वर्षावाची ती ओढ..
या ओढीच्या त्या मनदार खुणा आणि माझ्या स्वप्नात जपलेली तू..
खरच खूप खूप छान वाटत..

निखिल

पहिला पाउस

पाऊस आशेची तहान, तहानलेली आस..
आशेचे थेंब आणि थेंबांच्या सरी..
हा पहिला पाऊस सुखावतो....

जिवांची मैत्री, मैत्रीच्या भावना..
भावनांचे प्रेम आणि प्रेमाचा वर्षाव..
हा पहिला पाऊस हिणवतो...

काळाचा पडदा, पडद्यामागील आठवणी..
आठवणींच्या वेली आणि वेलींचा फैलाव..
हा पहिला पाऊस वेडावतो.....

पहिला स्पर्श, स्पर्शाची ती आपुलकी..
आपुलाकितली माया आणि मायेची गुंफण..
हा पहिला पाऊस खुणावतो....

हातातला तो हात, डोळ्यातले ते डोळे..
गालावरचे ते ओघळ आणि त्या ओघळातला मी..
हा पहिला पाउस गुंतवतो....

जीवांचा दुरावा,दुराव्यातली उणीव..
उणीवेची जाणीव आणि जाणीवेचा तो प्रत्येक क्षण..
हा पहिला पाऊस...पाणावतो.

निखिल

Sunday, May 1, 2011

Remember When..



Remember when I was young and so were you
and time stood still and love was all we knew
You were the first, so was I
We made love and then you cried
Remember when

Remember when we vowed the vows
and walked the walk
Gave our hearts, made the start, it was hard
We lived and learned, life threw curves
There was joy, there was hurt
Remember when

Remember when old ones died and new were born
And life was changed, disassembled, rearranged
We came together, fell apart
And broke each other's hearts
Remember when
( From: http://www.elyrics.net/read/a/alan-jackson-lyrics/remember-when-lyrics.html )

Remember when the sound of little feet
was the music
We danced to week to week
Brought back the love, we found trust
Vowed we'd never give it up
Remember when

Remember when thirty seemed so old
Now lookn' back it's just a steppin' stone
To where we are,
Where we've been
Said we'd do it all again
Remember when
Remember when we said when we turned gray
When the children grow up and move away
We won't be sad, we'll be glad
For all the life we've had
And we'll remember when

Saturday, May 31, 2008

माझ्या कविता

हळुच तु आठवतेस.....

अलगद फ़िरताना चांदण्या रात्रीत,
न्हातान्ना मनसोक्त त्या चांदण्यात,
ह्ळुच तु आठवतेस्....

लपतान्ना त्या आंब्याच्या मोहरात,
डुंबतांना कोकिळेच्या त्या मधुर् मंजुळ स्वरात,
ह्ळुच तु आठवतेस्....

भिजताना त्या ओथंबणारया वर्षावात,
पाघळता ते कोमल थेंब हळुवार् या गालावरुन
हळुच तु आठवतेस...

कुडकुडताना त्या बोचरया थंडीत,
अनुभवताना गारव्याचा तो गुलाबी सहवास,
हळुच तु आठवतेस.....

न्याहाळताना सागराची ती विशाल सौंदर्य,
लुटतना मजा त्या स्तब्ध लहरींशी खेळण्याची,
हळुच तु आठवतेस....

विसावताना अशाच एका शांत क्षणी,
जगण्याच्या स्वार्थी हेतुने श्वास ओढताना,
हळुच तु आठवतेस....
हळुच तु आठवतेस....

शोध
स्वप्नांच्या थव्यामध्ये कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो,
चांद्ण्या रात्रीत कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो,
शोधात असतो मी कुठल्या तरी आभासाच्या,
आभासात कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो.......


नकळतच प्रवेश करतो मी त्या आभासाच्या जगात,
त्या जगात कसल्यातरी शोधात भरकटत असतो,
आकर्षिला जातो कोण्या आभासी म्रूगजळामागे,
त्या म्रूगजळात कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो......


म्रूगजळात असताना लागते कुठेतरी एक जोरदार ठोकर्.....
येतो मी वास्तवात् बळेच्
त्या वास्तवात पुन्हा एकदा मी
कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो.......
कुठेतरी स्वतःलाच शोधत असतो.......