Wednesday, July 2, 2014

पहिला पाउस

पाऊस आशेची तहान, तहानलेली आस..
आशेचे थेंब आणि थेंबांच्या सरी..
हा पहिला पाऊस सुखावतो....

जिवांची मैत्री, मैत्रीच्या भावना..
भावनांचे प्रेम आणि प्रेमाचा वर्षाव..
हा पहिला पाऊस हिणवतो...

काळाचा पडदा, पडद्यामागील आठवणी..
आठवणींच्या वेली आणि वेलींचा फैलाव..
हा पहिला पाऊस वेडावतो.....

पहिला स्पर्श, स्पर्शाची ती आपुलकी..
आपुलाकितली माया आणि मायेची गुंफण..
हा पहिला पाऊस खुणावतो....

हातातला तो हात, डोळ्यातले ते डोळे..
गालावरचे ते ओघळ आणि त्या ओघळातला मी..
हा पहिला पाउस गुंतवतो....

जीवांचा दुरावा,दुराव्यातली उणीव..
उणीवेची जाणीव आणि जाणीवेचा तो प्रत्येक क्षण..
हा पहिला पाऊस...पाणावतो.

निखिल

No comments: