Wednesday, July 2, 2014

पाऊस आणि मी


पहिला पावसाचा तो टपोरा थेंब..तो अलगद स्पर्श..
त्या थेंबातून डोकावलेला तो धनु आणि माझ्या सोबतची तू ..
खूप छान वाटत...

थेंबांचा तो आसुसलेला आवाज..त्यतली ती आतुरता..
त्या आवाजाला साजेशी ती किलबिल आणि माझ्या गाण्यातली तू..
खूप छान वाटत...

सरींचा तो ओलावा...त्याचा तो तांबूस रंग..
त्या रंगाकडे खेचणारा तो सुगंध आणि माझ्या जाणिवेतली तू..
खूप छान वाटत...

सरींचे थेंब आणि थेंबाचे तळे ...त्याची ती स्तब्धता..
त्या स्तब्ध्तेतली ती उत्कटता आणि माझ्या आठवणीतली तू..
खूप छान वाटत..

पाणावलेल्या वाटा..वाटांची ती वळणे..
त्या वळणांवरच्या त्या पाऊलखुणा आणि माझ्या डोळ्यातली तू..
खूप छान वाटत...

हा पहिला वर्षाव...त्या वर्षावाची ती ओढ..
या ओढीच्या त्या मनदार खुणा आणि माझ्या स्वप्नात जपलेली तू..
खरच खूप खूप छान वाटत..

निखिल

No comments: